तेल तापवून ते धुरावल्यावर ज्योत बारीक करून मिरच्या घालाव्यात. त्या खमंग तळल्या गेल्यावर कांदा घालून परतावे. कांद्यापुरते मीठ घालावे. ज्योत मध्यम करावी.
कांदा रंग बदलू लागला की हळद आणि गरम मसाला घालावा. दोन मिनिटांनी मटार घालावा. मटारापुरते मीठ घालावे. नीट परतून घेतल्यावर त्यावर कोथिंबिरीच्या काड्या बारीक चिरून घालाव्यात. ज्योत बारीक करावी.
मधून मधून हलवत रहावे.
पंधरा मिनिटांनी त्यात पनीरचा भुगा आणि पनीरपुरते मीठ घालावे. ज्योत मध्यम करून सगळे एकत्र परतावे.
पाच मिनिटांनी ज्योत बारीक करावी आणि हलवावे.
पाच मिनिटांनी त्यावर कोथिंबिरीची पाने बारीक चिरून घालावीत आणि सारखे करून घ्यावे.
दोनेक मिनिटांनी ज्योत बंद करावी.
यात मुख्य चव कोथिंबिरीची आहे. गरम मसाला सहायक भूमिकेत आहे. कोथिंबिरीचे प्रमाण आवडीप्रमाणे वाढवता येईल.
निरंतर ऊर्ध्वश्रेणीकरण
पायाभूत सुविधांमध्ये सातत्याने होत असलेली दैनंदिन प्रगती पाहून यापुढे मनोगतासाठी निरंतर ऊर्ध्वश्रेणीकरणाचा अंगीकार करणे उचित दिसत आहे. त्याप्रमाणे आवश्यक ते बदल व्यवस्थेत केले जात आहेत. manogat.prashaasak@gmail.com ह्या पत्त्यावर आपल्या अडचणी व/वा सुचवणी विपत्राने कळवता येतील.