कृत्रिम बुद्धिमत्ता निर्मित गाणे

कृत्रिम बुद्धिमत्ता निर्मित गाणे

काही दिवसापूर्वी मी माझी एक कविता कोणाच्या तरी आवाजात स्वरबद्ध व्हावी असे वाटत होते. कविता आणि गाणे ह्यात फरक असतो. प्रत्येक गाणे कविता असते, पण प्रत्येक कविता गाणे होईलच असे नाही. पण मला आशा होती की लिहिली कविता गाणे होऊ शकेल, पण त्याला स्वरबद्ध करायला संगीतकार आणि  गायला गायक ही जुळवा-जुळाव करणे अवघड होते. 

मी कृत्रिम बुद्धिमत्ता वापरायचे ठरवले. त्या प्रमाणे सुनो (Suno) हे एप वापरून गाणे बनविण्याचा प्रयोग करून बघितला. त्याच्या मोफत आवृत्तीमध्ये काही मर्यादा आहेत. काही मराठी उच्चार चुकतात, बऱ्याचवेळा गाण्यातले भाव बरोबर येत नाही, पण लावलेली चाल आणि संगीत काहीवेळा चांगले असते. 

एप मोफत वापरातनं २४ तासात तुम्हाला बहुतेकवेळा ५ वेळाच मोफत वापरता येते. जास्त प्रयत्न हवे असतील तर मूल्य द्यावे लागते. तुम्हाला तुमचे शब्द आणि गाणे कसे हवे आहे ह्या सूचना द्याव्या लागतात. एका प्रयत्नात त्या शब्दांनी २ गाणी तयार होतात. कधीकधी दिलेल्या सूचना वापरल्याजातीलच असे नाही. एखादा शब्द चुकला पण चाल आणि संगीत तसेच ठेवायचे असेल तर ती सोय अधिक मूल्य देऊन मिळते.

कृत्रिम बुद्धिमत्ता निर्मित गाणे - २एखाद्याला जर प्रयोग म्हणून काही शब्द स्वरबद्ध करायचे असेल किंवा एखाद्या संगीतकाराकडे सृजनशीलता नसेल आणि छोट्यामोठ्या चुका दुर्लक्ष करता येत असेल तर हा पर्याय चांगला. 

पण धोकादायक गोष्ट ही की जशी-जशी कृत्रिम बुद्धिमत्ता सुधारेल तशी-तशी त्यातील दोष निघून जातील. कदाचित सृजनशीलता धोक्यात येईल. ही गोष्ट चांगली की वाईट हे प्रत्येकाने ठरवावे.

कृत्रिम बुद्धिमत्ता निर्मित काही गाणी.

धाव घेई विठ्ठला, दर्शन देई विठ्ठला

Ratra Ardhi Sarali

ढगाळलेल्या नभात

रात्र अर्धी सरली

जुई Jui (Version 1)

जुई Jui (version 2)

रात्र अर्धी सरली Ratra Ardhi Sarali