खाद्य-उखाणे..

प्रिय मनोगती,
उखाण्यांचा एक नवीन प्रकार म्हणून 'खाद्य-उखाणे' ही संकल्पना मांडत आहे. यात नवीन उखाणे सुचवावेत.
अट एवढीच की हे उखाणे खाणे व इतर संबंधित विषयातील ( उदा.स्वयंपाक,स्वयंपाकघर,पाककृती,पदार्थ,चव..इ ) असावे.
खाणे-पिणे हा विषय असल्याने पिण्यात फक्त घरगुती खाद्यपेयांचाच उल्लेख असावा. (उदा. कढी,लस्सी,सार,सरबत,नारळपाणी.. इ)  मद्य व मद्यपान हे विषय (पूर्णपणे वर्ज्य! )म्हणून टाळावेत.


सुरवात म्हणून काही उखाणे खाली देत आहे. यात नवऱ्याला ज्या प्रकारे, अर्थात एकेरी (उदा. अमूक,अमूकड्या) किंवा आदरार्थी..(अमूकराव,तमूकपंत) नावाने सम्बोधन असेल त्या प्रकारे क्रियापदात योग्य तो बदल करावा.


जयन्ता५२


 


लग्नानंतर माझी आहे बाई खूप मज्जा
.....राव करतात म्हणे खूप मस्त पिझ्झा!


लग्नानंतर राहणार आहे मी खूप सुखात
.....राव जात होते म्हणे कुकींगच्या क्लासात.


लग्नाला आमच्या दिवस झाले सोळा
.....राव एवढ्यातच शिकले स्वयंपाक सगळा !


.....राव,लब्बाड,म्हणतात 'बाहेर जाऊ जेवायला'
म्हणे,औषधांच्या बिलापेक्षा पेट्रोलचा खर्च परवडला !


 


चला मंडळी.. घ्या खाद्य उखाणे..