वाचायलाच हवे असे...

वाचायलाच हवे असे आधीच झालेले काही लिखाण या चर्चेत आपण एकमेकांना कळवू शकतो. जसं की आज प्रविण दवणे यांचा आनंदाची पूर्वतयारी हा अप्रतिम लेख माझ्या वाचनात आला, तुमच्यापैकी बऱ्याच जणांनी तो वाचला असेलच पण ज्यांनी वाचला नाही त्यांना वाचता यावा म्हणून इथे देत आहे. असे लेख या चर्चामालेत सुचवले जावेत ही अपेक्षा आहे. या चर्चेबद्दल काही सूचना असल्यास त्यांचं स्वागतच आहे.