पहिला पाऊस !

अगं आई बघ
पाऊस हा आला
चल ना जाऊ बाहेर
पावसात भिजायला

झाली परीक्षा आमची
तरी का गं कटकट
जाऊ या ना भिजायला
उघड दार झटपट

झाली सर्दी, आला ताप
तरी चालेल मला
नाही देणार मी त्रास
कडू औषध प्यायला

चल ना जाऊ पावसात
येते गंमत भिजायला
पहिला पाऊस औषध घामोळ्याचे
आजीच सांगते मला

- सौ. गुजराथी.

कवयित्रीचं पूर्ण नाव माहित नाही, म्हणून जितकं माहितेय तितकं लिहिलंय.