शेजवान सॉस.

  • लसून १०० ग्रॅम, आलं १०० ग्रॅम, हिरव्या मिरच्या ५
  • सेलेरी १ टे. स्पून, टॉमेटो सॉस १/२ वाटी, सोयसॉस १ ट. स्पून
  • चिली सॉस २ टे. स्पून, व्हिनेगर १ टे. स्पून
  • काश्मिरी मिरची पावडर ६ टे. स्पून, साखर १ टे. स्पून, लालरंग पाव टे. स्पून
  • मीठ १ टे. स्पून, अजिनोमोटो १ टे. स्पून
  • तेल पाऊण कप
३० मिनिटे
एकाला एक वेळ

तेल गरम करून गार करणे.
व्हिनेगर व तेल सोडून सर्व साहित्य एकत्र करणे.
वरून तेल आणि मग व्हिनेगर घालणे.चवीनूसार मीठ घालावे.
फ़्राईड राईस आणि नूडल्स मधे घालून खाणे.

शेजवान सॉस जेवढा मुरेल तेव्हढा चांगला लागतो.
चायनीज पदार्थ शेजवान स्टाईलने करण्यासाठी हा सॉस वापरावा.

बहिण.