१५ मार्च २०९४- अंत ! - भाग-१

१५ मार्च २०९४.


सर्व जग एका संगणक प्रणाली मध्येच व्याप्त होऊन राहिले आहे.. हवेत  उडणाऱ्या ह्या गाड्या ..... उंच च्या उंच ह्या इमारती.... हो उंची वरून आठवले... आपल्याला खाली जाऊन तर महिना लोटला आहे.... होऊ दे रे बाबा महिना कोण जाणार सारखे सारखे १०KM खाली त्या जमीनी वर ? राहू दे पुढच्या महिन्या मध्ये पाहू.


माझे घर ? कधी वाटते की मी घरामध्ये राहतो आहे की एकाद्या संगणक प्रणाली मध्ये... हात धुण्यासाठी जरी नळा समोर हात धरला तर तो नळ देखिल हातांच्या रेषा वरून तुमची ओळख पटवतो व मगच पाणी देतो.. काय सांगू



सकाळचे १०.०० वाजले आहेत. कार्यालयात जाण्याची धावपळ चालू झाली आहे.



माझे मनगटी घड्याळासारखे दिसणारे ( 3d holograpgic view computer system) ३D holo  आज काही तरी संदेश दाखवत होते पण मी माझे बूट तथा मोजे ह्यामध्येच व्यस्त होतो.. काही च कळत नव्हते काल ची चूक एवढी मोठी तर नव्हती मग साहबाने मला का बरे मला निर्वाणी चा इशारा दिला असेल त्या संगणकामध्ये असे आहे तरी काय ? चल मरू दे तिकडे.. १०.३० वाजले आहेत... कार्यालयाकडे जावे लागणार आहे.. आज काल तर माझ्या गाडी मध्ये देखिल काहीतरी अडचण आहे जेव्हा ही हवेत झेपावते तेंव्हाचं अचानक हेलकावे खाते ह्या पगारामध्ये नवीनं ह्यावी लागेल वाटते आहे...


"अरे अरे काय हे जरा बघून नाही का चालता येत." मी. हा कोण अचानक येवढ्या घाई ने जातो आहे... लिफ्ट कडे ? चल मरू देत त्याला. आज स्नेहा कोठे दिसत नाही आहे ... हम्म असेल कुठेतरी संगणकावर सुरक्षा तंत्र मजबूत करत बसलेली...
11.00 वाजले आहेत.. चला माझी नोकरी सुरू झाली आहे...
माझे काम.... हम्म.. सरकार ने भारतातील सर्व च्या सर्व संगणकांना जोडण्या साठी एक महासंगणक बसवले ला आहे तो संगणक म्हणजे ज्या ज्या गोष्टी संगणका द्वारे चालतात त्या त्या सर्व गोष्टींना हा संगणक सुरक्षा तथा माहिती पुरवतो ... ह्याला सुरक्षा प्रदान करण्या साठी सरकार ने संगणक क्षेत्रातील नामवंत लोकांना एकत्र करून एक संघटना तयार केली आहे. ( IDSS -Indian digital security system ) व मी ह्या IDSS मध्ये संगणक सुरक्षा प्रणाली विकसित करण्याचे कार्य करतो आहे.


बीप बीप.. माझा 3d holo काही तरी संदेश दाखवत आहे... काय ?? अरे देवा ! असे कसे होऊ शकेल.... शक्यच नाही... जाऊन बघायला हवे... खाली काय झाले आहे ते.......


 


क्रमशः: