काजुची बर्फ़ी

  • १ वाटी डाळीचे पीठ,
  • १ वाटी काजुची बारीक केलेला (जास्त बारीक नको)
  • साधारण सव्वा वाटी साख़र (कमी गोड आवडत असेल तर साखर थोडी कमी)
  • वेलदोडे पूड
  • एक वाटी साजूक तूप
३० मिनिटे
२०-२२ वड्या

साजूक तूपावर डाळीचे पीठ भाजून घ्यावे.

कढईत साखर आणि थोडस पाणी घालुन एकतारी पाक करावा. त्यात डाळीचे पीठ  घालुन जरा परतावे . नंतर काजूची पावडर घालुन जरा परतावे . गोळा होत आला की वेलदोडे पूड घालावी.

ताटाला तूप लावून त्यावर पसरावे. गार झाल्यावर वडया कापाव्यात.

नाहीत.

एक मैत्रीण