कैरीची डाळ

  • मध्यम आकाराची १ कैरी
  • २ वाट्या हरभरा डाळ [ चार तास भिजवुन - निथळुन]
  • पाव वाटी ओले खोबरे[बारीक तुकडे]
  • ३-४ हिरव्या मिरच्या,१ चमचा साखर,जीरे , कोथिंबीर चिरलेली पाव वाटी, मीठ चवीनुसार
  • फोडणी - तेल २ चमचे, १ चमचा मोहरी,हिंग चिमुटभर, कडीपत्ता ५-६ पाने
१५ मिनिटे
४ जणांसाठी

कैरीचे साल काढुन बारीक तुकडे करुन, त्यात डाळ,ओले खोबरे,मिरच्या घालून मिक्सर मधे  वाटुन घ्या.

नंतर त्यात  साखर, मीठ घाला, परत एकदा मिक्सर  लावा . हे मिश्रण जाडे-भरडेच असावे.

फोडणी करताना तेल कडक तापल्यावर त्यात मोहरी,हिंग,कडीपत्ता घालावे. लगेच मिश्रणावर घालावी.

कोथींबीर घालुन मिक्स करा.  

वाढण्याआधी थंड करावी.

कैरी जरा आंबट असावी.

डाळ आणि खोबरे जाडसरच ठेवावे.

पाट्यावरती वाटलेली  कैरीची डाळ अजुनच चवदार लागते.

समर्थ काकु