कणीस कीस

  • कोवळी मक्याची लहान आकाराची कणसे ३-४
  • मिरच्यांचे बारीक तुकडे २-३
  • कोथिंबीर २ चमचे, ओला नारळ २ चमचे,
  • दाण्याचे कूट २ चमचे, मीठ, चिमुटभर साखर
  • तेल २ चमचे, मोहरी, हिंग, हळद
१५ मिनिटे
१ जण

मक्याची कोवळी कणसे किसून घेणे. तेलाच्या फोडणीमध्ये मिरच्यांचे तुकडे घालून नंतर त्यात किसलेला मक्याचा कीस घालणे. २-३ वाफा देवून शिजवणे व परतणे. नंतर त्यात दाण्याचे कूट, कोथिंबीर, ओला नारळ, साखर व चवीप्रमाणे मीठ घालून परत २-३ वाफा देवून परतणे. गरम गरम खाणे.

रोहिणी

मक्याचा कीस पौष्टीक आहे व थोडा खाल्ला तरी पुरतो.

सौ आई