मन माझे मीरा होते

तुझा सूर कानी येता


मन माझे हरखून जाते


तो सूरच माझा कान्हा


मन माझे मीरा होते


दिसतात व्रुक्ष ते अजुनी


खान्द्यावर ज्यान्च्या दोले


इथेच दिलेस का तू रे


त्या राधेला हिन्दोळे?


ती नदी,तो हळवा वारा


ते गोधन, तो सान्जकिनारा


सगळेच तुझे रे साथी


मग का तुझा विरह हा


फ़क्त माझ्याच हाती..