पटकन उत्तर द्या - २


समजा तुम्ही एका शर्यतीमध्ये धावत आहात. नेहमीप्रमाणे आठ स्पर्धक यात भाग घेत आहेत. अगदी शेवटच्या क्षणी तुम्ही दुसऱ्या क्रमांकाच्या स्पर्धकाला मागे टाकले तर तुमचा कितवा नंबर येईल? काय म्हणालात, पहिला? .. उत्तर चुकले. ... बरोबर उत्तर आहे...तुम्ही तिसऱ्या नंबरवरून दुसऱ्यावर गेलात. ..हा भाग जवळ जवळ दोनशे लोकांनी वाचलेलाच आहे. आता कृपया पुढचा भाग सुद्धा वाचावा. .........................


आता समजा तो तुमचा दिवस नव्हताच. सुवर्ण, रौप्य, कांस्य यांतले कुठलेही पदक हाती लागण्याची शक्यताच नव्हती. तरीही शेवटच्या क्षणाला आपला सारा जोर पणाला लावून तुम्ही सर्वात शेवटी असलेल्या खेळाडूच्या पाठीमागून पुढे गेलात तर तुमचा कितवा नंबर येईल?


.


शेवटून दुसरा, म्हणजे सातवा असंच ना?


.


.


नाही. हे उत्तर सुद्धा बरोबर नाही.


.


अहो,  तुम्ही एक तर  स्वतःच शेवटच्या स्थानावर होता किंवा आधीच त्याच्या पुढे होता. तेंव्हा त्याच्या पाठीमागून पुढे कसे जाणार? मुळात हा प्रश्नच चुकीचा आहे. कुठल्या अकलेच्या कांद्यानं विचारला? त्याला बरोबर उत्तर कसे मिळणार?


...............................


हे ही जाऊ द्या राव.  आपण आणखी थोडं बोलू. ही शर्यत आंतरराष्ट्रीय होती बरं कां. त्यात चिनी, जपानी, आफ़्रिकी वगैरे सगळ्या वंशाची माणसं होती. त्यांची नांवे खालीलप्रमाणे होती


कखा,  खागि,  गिघी,  घीङु ,  ङुचू ,  चूछे, छेजै


आठव्या खेळाडूचे नांव काय बरे असेल?


.


.


कोण म्हणालं  जैझो ?


.


.


.


तुमचं नांव जैझो आहे कां?