स्मृति

स्मृति
माझ्या डोळ्यात ये पाणी ,तव स्मृतिने साजणी
भैरवीचे सूर गाते ,आज रात्र देख़णी


चांदण्याला मी आसवांच्या माळेत गुंफले 
जाईजुई भारावल्या , सूर तयांचे गोठले

मेघ वेडे थांबले,  वारा मंद जाहला
माझ्या स्वप्नपाखरांचा थवा कोठे पांगला?


आज तू दूर सजणी , स्मृतिस देतो आलिंगने
वचनांची आपुल्या करतो मी ,आजही पारायणे