अश्रु

अश्रु
मनातलं काहुर
डोक्यातलं काहुर
तुंबळ युद्ध
वा नुसतीच हुरहुर
डोळ्यांना चाहुल
फुटे अश्रुंना पाउल

नुसतेच साश्रु नयन
तर कधी मुक ओघळ
कधी मात्र फुटे
बांध
त्यंचा जणु महापुर

सामावुन घेतात
दुखांचा सागर
म्हणुनच कि काय
त्यांची चवही असते खारट!!