मेथांबा

  • दोन मध्यम आकाराच्या कैऱ्या
  • कैऱ्यांच्या फोडी जेवढ्या होतील, तेवढाच गूळ(आवडीप्रमाणे कमी-जास्त)
  • मीठ चवीप्रमाणे
  • फोडणीसाठी -तेल, मेथ्या -एक चमचा, मोहरी, हिंग-जरा जास्त, हळद, भरलेली मिरची
  • एक चमचा तिखट
३० मिनिटे
साधारण आठवडाभर पुरेल.

कायरस / मेथांबा

कृती - कैऱ्यांची साले काढून त्यांच्या बारीक फोडी कराव्यात.  फोडणीसाठी तेल तापवून त्यात मेथ्या, व इतर सर्व साहित्य घालावे.  फोडणीतच भरलेली मिरची चुरुन घालावी.  त्यावर कैऱ्यांच्या फोडी घालाव्या.  एका वाफेतच कैरी शिजते.  त्यात गूळ, मीठ, तिखट घालावे.  साधारण १० ते १५ मिनीटात कायरस तयार होतो.  गार झाल्यावर बाटलीत भरुन ठेवावा.

चवीला आंबट, गोड, तिखट लागतो.

उन्हाळ्यात कोरड्या पोळीभाजीच्या डब्याबरोबर न्यायला छान.  सॅन्ड्वीच स्प्रेड म्हणून आणि  तांदळाच्या भाकरी अगर धिरड्यासोबत मस्तच!

सुगरण नणंद