दोन रुबाया...

'चित्त' ह्यांनी रुबाईबद्दल इथे माहिती टाकलेलीच आहे. त्या मुळे अधिक सांगणे न लगे...
दोन रुबाया लिहिते आहे...


का शब्द शब्द होऊनी मनमोर खुळा नाचावा
ह्या धुसर झांजरवेळी डाव पुन्हा मांडावा
प्रेमाचे फसवे गाणे का यावे त्याच्या ओठी
अन माझाच भाबडा जीव मी युगे युगे जाळावा.


तुझं वेगळं जग.. .. माझं वेगळं जग
समजते पण उमजत नाही अवघी तगमग
वीज चमकते घनात तसाच तूही मनात
ढळली ही सांज सख्या आता तरी बघ.