तू श्रीमलंग म्हण
त्याला हाजीमलंग म्हणू देत
तू प्रार्थना कर हात जोडून
त्याला गुढगे टेकून नमाज पढू देत
तू साष्टांग दंडवत घाल
त्याला सजदा करू देत
तुमचा भक्तीभाव
माझ्यापर्यंत पोहोचलाच तर
मी राहीनच उभा समोर तुमच्या
तुझ्याही आणि त्याच्याही
जन्मभराच्या पापांना मिटविण्यासाठी
कारण माझ्यासाठी काहीच फरक नाही
तुझ्यात आणि त्याच्यात
तूही नकोस विचार करू
मी अंश कुणाचा
देवाचा की अल्लाचा ?
आणि शेवटी कोणता प्रश्न महत्वाचा ?
मी धावून आलो की नाही ? हा
की आलो धावून तेव्हा माझं नाव काय होतं ? हा ?
('सजदा' हा शब्द बरोबर आहे की तिथे कुठलातरी दुसरा शब्द पाहिजे याबद्दल कृपया मार्गदर्शन करावे)