फाळणी

                     


=======================================
एक होती झुडुपे सारी
जरी मुळे त्यांची वेगळी
ज्यावर उभा हा डोलारा
ती मातीच आता दुभंगली
=======================================
आहोत आम्ही पुरते अडाणी
ज्ञान तुमचे  आहेच मोठे
फुगवायला सत्तेचे लोणी
'दुधावरची साय' विसकटे
=======================================


बोक्यांनो,


आता तुमचा काळ भरला
तरूण देश एक झाला
मोडेल पण झुकणार नाही
आता माघार शक्य नाही !


=====================================
पेटलेला वणवा सारा
करेल का शांत सुखांत
समतेचा सुगंध घेऊन
येईल का हो हा पर्जन्य
=====================================


हो येणारच, मुंबईच्या आझाद मैदानावर आज
(इतर मागास) आरक्षण विरोधी आंदोलनाला प्रचंड प्रतिसाद!!
अजूनही बरेच काही होऊ शकते..
=====================================