इंद्रधनुच्या रंगानी तू
दिलीस वचने कशी जपू मी
रंगबावरी वेडी राधा
कशी कुठे अन का लपवू मी........
मोरपिसांचे शब्द तूझे रे
साद घालती अशी अनाहूत
नकळे मलाच माझे हे स्वर
अनोळखिसे गाणे गाती........
गंध तूझा हा घेऊन वारा
झुलवी मजला हिंदोळ्यावर
मिटल्या नयनी तूझा कवडसा
भेदूनी जातो तनामनाला...........
सांजरात ही घेऊनी आली
लक्ष दिप हे तव प्रितीचे
उजळून गेली कातरवेळही
सरता सरता जीवन माझे.............!
शीला