हे सोडवा

खालील चित्रात एक रेल्वे मार्ग दाखवला आहे. त्याची महिती अशीः


१. मधल्या रूळावर इंजीन (इं) आहे. लांबी १५ मीटर.


२. बाकी दोन (अ, ब) डबे आहेत. लांबी प्रत्येकी १० मीटर.


३. डाव्या बाजूकडील दोन रूळ जिथे मिळतात तिथून डावीकडील शेवटापर्यंत (काळा चौकोन) लांबी २५ मीटर.


४. उजव्या बाजूकडील दोन रूळ जिथे मिळतात तिथून उजवीकडील शेवटापर्यंत (काळा चौकोन) लांबी १५ मीटर.


५. वर सरळ गेलेला रूळ अमर्याद.


काय करायचे?


 


च्या ठिकाणी आणि  च्या ठिकाणी आणून ठेवायचे आणि इंजीन परत मूळ जागेला (मध्ये) आणायचे.


काही सूचना (क्लु ला मराठी शब्द काय?)


डावीकडील जागेत इंजीन आणि एक डबा मावेल. उजवीकडील जागेत फक्त इंजीन मावेल. जिथे रूळ मिळतात तेथे इंजीन U टर्न घेउ शकत नाही. म्हणजे जर आधिच्या रूळावर इंजीन पुढे व डबा मागे असेल तर दुसऱ्या रूळावर डबा पुढे व  इंजीन मागे असेल.


जो (जी सुद्धा) हे कोडे ५ मिनींटात सोडवेल तो/ती खरोखरच हुशार.. (ह. घ्या..)