शिमला मिरची

  • शिमला मिरची-२,कांदा-१,लसूण-आल्याची पेस्ट,१ चमचा तिखट,
  • १/२ टि‌. स्पून हळद,मीठ चवीनुसार,जीरे,मोहरी,
  • भाजलेले दाण्याचा कूट १/२ वाटी,फ़ोडणीकरता तेल
३० मिनिटे
२-३ व्यक्तींकरता

सर्वप्रथम शिमला मिरची धुवुन तिचे बारिक व लांब काप करुन घ्यावेत.कांदा बारिक करुन घ्यावा.त्यानंतर पातेले घेवुन त्यात २-३ मोठे चमच तेल टाकावे.तेल गरम झाल्यावर त्यात जीरे ,मोहरी टाकावी.मग चिरलेला कांदा लालसर होईपर्यंत परतावा.त्यात लसून आल्याची पेस्ट टाकावी.मग ह्ळद,तिखट,मीठ टाकुन परतुन घ्यावे.आता त्यात बारिक चिरलेली शिमला मिरची टाकुन वाफ़ेवर शिजवुन घ्यावे‌. शिमला मिरची शिजल्यानंतर त्यात वाटलेला दाण्याचा कुट टाकावा.५ मिनिटे ठेवुन गॅस बंद  करावा.(शिमला मिरची ताजी असेल तर ती १० मिनिटातच वाफ़ेवर होते)

 

ज्यांना दहि आवडतं ते ह्यात दहि सुध्धा घालु शकतात.

पोळी आणि कढि सोबत फ़ार छान वाटते.

आई