धुंद वाटा धुंद रस्ते
मार्ग ही हे धुंदलेले
त्यांचाच मी माझेच ते
पण हात माझे बांधलेले,
जरी माया लावुन प्रेम देवून
त्यांनी मजला घडविले
केलेले अन करविलेले
त्यांनीच पाणी बुडवीले,
त्यांच्या मनतिल तरुणीशी
चुप चाप मी लग्न केले
माझ्या घराला परिवाराला
तीनेच मग भग्न केले,
आज मी न त्यांचा
ती तीच्यांची
तीच्यांच्या साठी सारे खुले
पण हात माझे बांधलेले
पण हात माझे बांधलेले.