एकटी

आजकाल आम्ही दोघे सतत बरोबर असतो,


असेन तिथे, अथकपणे तो मला सगळावेळ सोबत करतो.


त्याच्याशिवाय कुणालाही माझ्यासाठी वेळ नसतो,


माझा एकटेपणा आणि मी आता कायम... कायम एकत्र असतो.


उर्मि