देवबाप्पा देवबाप्पा

देवबाप्पा देवबाप्पा


देवबाप्पा देवबाप्पा खाऊ दे मला..!
मित्रांसोबत खेळायला जाऊ दे मला..!!


खाऊ दिलास तरच
मी तुझ्याशी बोलेन..!
कंटाळा आला तुला की,
मी तुझ्याशी खेळेन..!!
दिलास नाही खाऊ तर गट्टी मी देईन तुला..!
देवबाप्पा देवबाप्पा खाऊ दे मला..!
मित्रांसोबत खेळायला जाऊ दे मला..!!


देवबाप्पा देवबाप्पा
खरं सांग मला..!
माझ्यासारखी छोटी मुलं
आवडतात का तुला..?
आमच्यावरचं प्रेम तुझं पाहू दे मला..!
देवबाप्पा देवबाप्पा खाऊ दे मला..!
मित्रांसोबत खेळायला जाऊ दे मला..!!


माझं थोडं ऐकशील का?
विचारीन ते बोलशील का ?
बाबा म्हणती 'शाम' तुला
आई म्हणते 'राम' तुला..!
खरं तुझं नाव काय सांग ना मला ..?
देवबाप्पा देवबाप्पा खाऊ दे मला..!
मित्रांसोबत खेळायला जाऊ दे मला..!!


अरुण...!