समोरच्या आरशात पाहून
मी कुंकू नीट लावले
इतके कसे तुझे डोळे
मला आरशासारखे भासले ?
तुझी आठवण येते नेहमी
दिवस सरल्यावर
सावळी संध्याकाळ अशी
माघारी फिरल्यावर.
काही नाती तशी असावीत
जशा रेशीमगाठी
सुटल्या जरी चुकून
खंत नाही ओठी.
कुंपण असतं लक्ष्मणरेषेसारखं
मर्यादेची जाणीव करून देणारं
एखादं कुंपण असतं तसंदेखील
आपणहून आपलंच शेत खाणारं.