डा-विंची कोड आणि भारतीय धर्मनिरपेक्षता!!!

खूप आले खूप गेले ... धर्म हो!! भारताला धर्म ही काही अपूर्वाई नव्हे. आम्ही "सर्वधर्मसमभाव" ही संज्ञा फार वेगळ्या अर्थाने वापरली. इंग्रजीत सांगायचे झालेच तर "loosely". DaVinci Code हा जगभर चालला, भारतात त्याच्यावर बंदी घाला म्हणे!! का? अरॆ युरोपात चालला. अमेरीकेत पळतोय अजून. मग भारतातल्या ख्रिस्ती समाजाला काय त्रास आहे? मी मानतो की, तो चित्रपट कॅथॉलिक चर्चच्या कल्पनेला धक्का पोहचवणारा आहे. पण तो ख्रिस्ती धर्माच्या विरोधात नाही. मग कसला हा विरोध?

सर्वोच्च न्यायालयाने सांगितल्याप्रमाणे डॅन ब्राऊनची ही कथा निव्वळ कादंबरी आहे" हे सर्वांना मान्य असताना कसला न्याय मागता? तीन वर्षांनी जागे होऊन पुस्तकावर बंदी नकॊ तर, चित्रपटावर बंदी हवी असेल तर हे चूक आहे. बोला न्यायदेवता विजयी भवः।

अरे हे तर काहीच नाही, Jyllands-Posten ची महंमदावर व्यंगचित्रे प्रसिद्ध झाली तेंव्हा भारत कुठॆही मागे नव्हता. आम्ही जगभर उठाव केला. मुसलमानी देशांनी करो अथवा न करो, आम्ही केला. मी त्या व्यंगचित्रांची प्रशंसा करत नाहीये.

हे तर जरा जास्त झाले की हिंदु मागे राहीले, बाबरी मशीद पाडताना त्यांनी स्वतःची मनमानी केलीच की. ते जर कमी असेल तर मुंबईत बाळ ठाकरेंचा फोटॊ लावा. आंधळॆ हिंदुत्व हे सगळ्यांना माहीतच आहे, जे राजकारणी लोकांनी देशाला शिकवले. हुसेनसाहेबांनी देवाची गलीच्छ चित्रॆ काढली त्यावेळी पण आम्ही संप केलाच होता ना?

मला फक्त इतकेच म्हणायचे की भारतात सर्व धर्मांना पुरेसा वाव आहे आणि त्याचा अनुयय करायला पुर्ण अधिकार आहे. कॊण कसा त्याचा वापर करतो, हा आपापला प्रष्ण आहे. एकंदरीत काय? सगळॆ धर्म अनुयायी मनमानी करण्यासाठी भारतात येतात. भारतीयत्व विसरून धर्माचं राजकारण करतात. त्यानंतर राजकारणात, करदायकांचा पॆसा स्वताःच्या खीशात भरतात. परदेशी दौरे करतात. प्रत्येक पश्चिमी देश भारताचा नकाशा काश्मिर सोडुन दाखवतो, सगळ्या परकीय विमान कंपन्या काश्मिर पाकीस्तानात दाखवतात. मला सांगा एका तरी भारतीय नागरीकाने सर्वोच्च न्यायालयात फर्याद दाखल केली का? त्या मध्ये कोणाचाच फायदा नाही. मग का ही उठाठेव करायची?

मुसलमानांना एकापेक्षा जास्त लग्ने करण्याची मुभा आहे, तसे हिंदुंना आरक्षण आहे. ख्रिस्ती लोक भारतात beef खाऊ शकतात. आपण सर्वधर्मनिरपेक्ष की सर्वधर्मिय? सगळ्यांना आपापल्या प्रमाणे वागु दिले आणि त्यासाठी कायदे बनवत राहीलो तर समानता येणार कशी?


मुळ लेखन

विशाल खापरे