शुद्धिचिकित्सकात सुधारणा करता येईल का?

शुद्धिचिकित्सकाकडे दिलेली माहिती तपासून येण्यापूर्वी (शुद्धिचिकित्सकाशी संधान सुरू असताना), वेळ दाखविली जाते. ही वेळ 11:9:2 (११ वाजून ९ मि आणि २ से) अशी दिसते. वास्तविक ही वेळ 11:09:02 अशी असावी.
दुसरे असे की ही वेळ देवनागरी लिपीत दाखवता आली  (११.०९.०२) तर फारच उत्तम. (अर्थात हे तांत्रिकदृष्ट्या कठिण असेल तेंव्हाच आतापर्यंत केले नसणार याची जाणीव आहे. पण मनोगतावर या विषयाचेही बरेच जाणकार आहेत, तेंव्हा यावर विचार करता येऊ शकतो)


तुम्हाला काय वाटते?


-शशांक उपाध्ये