आयुष्याच्या वाटेवर चालताना,
जेव्हा तु भेटलीस.......
पावलांना झालेल्या असंख्य जखमा
अचानक पणे भरल्या सारख्या वाटल्या....
तुझ्या सोबत चालताना,
पुढील वाटेवरील काटे देखिल
पावलांना फुलां सारखे जाणवत होते....
ज्या डोळ्यांनी,
तु या मनाला स्पर्श केलास......
मनात उरला तो फक्त आनंद
तुझ्या त्या डोळ्यातुन वाहणारा आनंद.....
ज्या शब्दात तु मला जगण्याचा अर्थ समजावलास
ते शब्द मला आजही स्पष्ट पणे ऐकु येतात....
आज तु नाहिएस....
पण आयुष्याची वाट आजही, तशीच दिसते
फुलांनी भरलेली...
आजही डोळ्यातील अश्रु पुसण्यासठी पुढे
सरसावणारे तुझे हात मला दिसतात......
त्या सुंदर हातांचा स्पर्श माला आजही जाणवतोय!
पण पुढच्याच क्षणी आठवतं की ,
तु कधीच गेली आहेस..
अगदी कायमची.............
-नचि