पीशी

कोणी म्हनायचं वेडी तिला कोणी म्हनायचं पीशी,


उकंड्यावरच उपवास सोडायची ती साता जन्माची उपवाशी,


सजीवांपेक्षा निर्जिवांवरच तिचा जास्त भरवसा,


चाहुल लागता कोनाची घेतसे भिंतीचा आडोसा,


बीन माय बापची पोर ती विचारुच नका दशा,


चंद्राला भाऊ माननार होती नेमकि आज आमावशा,


त्याच्याच जखमी बोटाला बांधायला चिंदकं गोळा केले,


त्यांवरच उठाय बसायची म्हणुन काटे तरी नाहि बोचले,


एका बीन मिशीच्यानं शेवटी तिला सहारा दिला,


घालायला चार-दोन कपडे राहायला आसरा दिला,


पाच मिशिवाल्यांना वाटलं काहिका असेना बरं झालं,


पीशी सावरनार होति पिशेपनाला पण तिचं पोट वर आलं,


या पांडवांपैकी कोनाचा हा प्रताप हा आत्ताच प्रश्न्न आहे,


पीशी विचारतेय बीन मिशीवाल्यालाला, दादा कुठे माझा कृष्ण आहे?


दादा कुठे माझा कृष्ण आहे ?????????????????????????