भरलेले बटाटे

  • ५-६ छोटे बटाटे - दम आलू वगैरेला वापरतात तसे
  • अर्धी वाटी मक्याचे दाणे उकडून
  • अर्धी वाटी मटाराचे दाणे उकडून
  • १ हिरवी मिरची, १/४ इंच आलं, १ पाकळी लसूण
  • अर्धी वाटी पेपर जॅक चीज किसून
  • चिमुट्भर गरम मसाला, १/२ चमचा लिंबाचा रस
१ तास
कितीहि करा..कमीच पडतात

- बटाटे उकडून, सोलून बाजूला ठेवावे

- बटाटे अंडा करीला अंडी चिरतो तसे अर्धे चिरावे

- बटाट्याचे तुकडे बरोबर मधे कोरावे - कोरलेला बटाटा उकडलेल्या अंड्याचा पिवळा भाग काढल्यावर अंडं दिसतं तसा दिसतो

- उरलेले सर्व जिन्नस मिक्सर मधे वाटून घ्यावे

- बटाट्यामधे जो खड्डा होतो त्यात वरील सारण घालावे

- सर्व बटाटे भरून झाले की त्यावर थोडेसे बटर लावावे

- ओवन ३०० फॅ. ला तापवून घ्यावा

- त्यात हे बटाटे १५-२० मिनिटे बेक करावे.

- वाढताना वरून जीरे पूड टाकावी,  चिंचेच्या व हिरव्या तिखट चटणीबरोबर खावे

- खाणारे  आरोग्य-चिकित्सक नसल्यास बटाटे ओवन मधे न ठेवता, थोड्या तेलात तळावे

- अर्थातच बटाट्यात भरलेले सारण वेगवेगळ्या पद्धतीने करता येईल. आवडीनुसार बदल करावे.

- सारणासाठी अजून एक कल्पना मनात आहे - चिरलेला पालक, मके आणि थोडं डाळीचं पीठ असे मिश्रण शिजवून घेतल्यास छान लागेल असे वाटते. पण अजून करून पहायला वेळ झाला नाही. अमेरिकेत साउथ-वेस्टर्न एगरोल्स मधे असंच काहिसं घालत असावेत असं वाटतं.

मूळ कल्पना ऑन लाईन वाचली होती. सोयीनुसार बदल करून वापरली. ते संकेतस्थळ सापडत नाही