तू अन् मी
आतुरलेला तू
अन् बहरलेली मी
आसुसलेला तू
बावरलेली मी
कासावीस तू
हरवलेली मी
नादान तू
अजाण मी
प्रश्नार्थक मी
आश्वासक तू
स्वप्नील मी
हळुवार तू
बेहोष मी
मदहोश तू
स्वानंद मी
बेधुंद तू
हिंदोळा मी
आंदोलन तू
संमोहित मी
संमोहन तू
अनुनय तू
अनुराग मी
आवाहन तू
अनुमोदित मी
माझाच तू
अन् तुझीच मी