निःशब्द चांदण्यात
सुर लागले सप्तकी
श्वास मंद धुंद गीत
केश मोकळे झेलती
आभाळ असे वाकुन
क्षितीजास भेटले
डोळे मिटता समर्पणी
ओठ अलगद टेकले...
*******************
दाट धुक्याची चादर होवून
हळुच मजला वेढुन घे
दंवबिंदु जे सहज झिरपतील
प्रतीबिंब त्यात ठेवुन दे...
*******************
रात्र क्षितीजाकडे झुकावी
दिशांनी बदलावी कुस
भारलेल्या तारकांनी
फ़ेर धरावा चौफ़ेर
निःशब्द शांत क्षणाला
कवेत घेवुन गारव्याने
छेडावे श्वासाला
हलकेच स्पंदनाने
*********************