एकादशी निमित्त अवघा जनसागर विठ्ठल भेटीसाठी आतुर झाला आहे. या प्रसंगी काही ओळी सुचल्या आहेत. त्या आपल्यासमोर मांडत आहे.
****************** ओढ विठ्ठलाची *************************
विसरुनी सारे जाती, धर्म, पंथ
मिळालो येउन आम्ही वारकरी सागरा
तान्हुल्यास जसा लळा मातेचा
लागली तैसी आम्हा ओढ विठ्ठलाची
पंढरी आम्हा भासे स्वर्गापरी
दिंडी वाटे आम्हा प्रवास त्याचा
चंद्रभागा असे अमृतधारा
न्हाऊ घाले आम्हा विठ्ठल कृपे.
तल्लीन जाहलो आम्ही भक्तानुभावात
लागे आम्हा ओढ विठ्ठलाची
त्या सावळ्यासी मागणेची एवढे
मिटावे दुःख, क्लेश सर्वार्थाने
न्हाऊनी भक्ती-अमृते चिंब व्हावे सारे
अशी व्हावी कृपा विठ्ठलाची
--- संदीप बेडेकर