जुलमी जग

निरागस त्या लोचनांत प्रीतीची दाटली छटा
जुलमी जगाच्या मनी परी सले मग का काटा?


भाव आणि स्वप्नांनी सजली दुनिया तयांची
जुलमी जगाच्या मनी  का खपली आली जखमेची?


प्रीती का ही बंदी सदैव जुलमी जगाच्या दास्याची? 
तोडुनी पाश सारे आता चाखी गोडी मिलनाची