परीस अन कस्तुरी

मी जर चांगला असेल तर


माझ्यातला हा गुण अत्तराचा फाया व्हावा,


अन मी जवळ नसतांनाही


माझा सुगन्ध श्वासागणीक तुझ्या ऱ्हन्द्री जावा,


 


 


तुझ्या आठवणी साठ्वतांना मात्र


माझ्या ऱ्ह्दयाचं सोनं व्हावं,


अन तेच सोनं दागीना म्हणुन


सदैव तु तुझ्या कंठी ल्यावं,


 


 


आपण उरलो नसतांना ह्या ओळी


वाचाव्यात कधी कुणीतरी,


ओठांतुन दोनच शब्द फुटावेत त्याच्या


परिस अन कस्तुरी


परिस अन कस्तुरी.....................................