"लपंडाव"

एकलोकांच्या घोळक्यात कायमच


दिसणारा मी......


गर्दीत कोठेतरी हरवलेला असतो!!!


मला माणसात आणणाऱ्या तुला


नेहमीच कोठेतरी शोधत असतो...


माझं प्रेम जाणणाऱ्या तुला


माझं मन नेहमीच हाक मारत असतं


पण पहिल्या पावसतील धुलीकणांसारखी


ती हवेतच वीरघळून जाते.....


नेहमीच माझ्या हातात असाणारा


तुझा हात मला आजही जाणवतो,


पण वाळवंटातील मृगजळासारखा


तो ही एक भासच असतो...


प्रत्येक सुंदर फ़ुलात असलेला तुझा


चेहरा मला आजही दिसतो


पण मला पाहताच तो कोण्या एका पाकळीत लपून बसतो......


असा हा आपला लपंडाव


कायमच सुरु असतो...


या आपल्या खेळात राज्य मात्र 


एकट्या माझ्यावरच असतं....