१.
आज माझ्या स्वप्नात येशील का
अपुर्ण शब्द पुर्ण करशील का
डोळे हे वेडे तुझी वाट रोज पहातात
अश्रुंपुर्वी तुझी अपेक्षा आज तरी करू का
२.
धुंद मंद रात्र आहे,
हात तुझा माझ्या हातात आहे.
इतक्यात जायचा विचार करू नकोस,
सोबत मोगऱ्याची बरसात आहे.
३.
संध्याकाळ संपली रात्र सरली
उठलो तर होती सकाळ पुन्हा झाली.
आठवनींत तुझ्या आज दिवसही गेला
पाहतो तर समोर संध्याकाळ पुन्हा आली.
तुझाच,
सुहास.