आकाशात रोज दिसणारा तारा,
आज मला दिसलाच नाही.
बघ त्याला देखिल हे कळाले
आज तु मला भेटलीच नाहीस.
आज माझ्या प्रत्येक भावनांना
का म्हणून तडा जात आहे,
जरी आज मी थोडा लवकर आलो
तरी सूर्य मावळतानाच दिसत आहे.
मी नेहमीच जास्त अपेक्षा ठेवतो,
भेटायचे तुला आजही आहे.
भावनेच्या भरात कधी विसरून जातो,
की तो चंद्र अमावस्येचाही आहे.
किती वाट पहावी लागणार ते तरी सांग ना.........
सुहास.