अचानक कोडे उलगडले
आणि आयुष्य सर्वांगसुंदर होऊन गेले
शरीराच्या आत जर नासलेले असेल रक्त
तर द्यावी लागते एक चीर
आणि निचरा होऊन वाटते
हलके हलके
तसे हलके झाले मन
आणि उत्फुल्ल जीवन
लेखणीला फुटू लागले अंकुर
आणि वाटले की
आपण झालो आहोत
एक बहरून आलेले झाड
आनंदाची फुले गाळणारे.
झाडे जर सतत बहरत राहिली
तर आयुष्य असे
सर्वांगसुंदर होऊन जाते.