पाऊस म्हणतो तू चुकला
म्हणून माझ्या आधी तोच बरसला.
मी म्हणतो मला थोडा वेळ देशील,
तो म्हणतो अजून किती वेळ थांबशील.
मी पावसाला समजावतो आणि म्हणतो
थांब ही माझी पहीलीच वेळ आहे.
तिला मिळवण्यासाठी आता मला
खेळावा लागणार वेगळाच खेळ आहे.
आणि किती वेळा तिला समजावले
प्रेमात पडलोय किती वेळा म्हणाले.
पाऊस विचारतो, इतक्यात केव्हा बोललास
मी म्हणतो, इतक्यात जेंव्हा येवून गेलास.
पाऊस म्हणतो, आपण मित्र कि नाही,
परत विचार, बघू कशी हो म्हणत नाही.
मी म्हणतो, तुला एवढी कशी खात्री,
तो म्हणतो, हमी देते आपली मैत्री.
मग मी लगेच तिला मोबाईल केला,
सूरू,
प्रिये,
तु माझी होशील का ?
जितके प्रेम मी तुझ्यावर करतो,
तितकेच तु माझ्यावर करशील का ?
आता ती म्हणते,
........
मी म्हणालो, काय ?
परत,
........................
परत मी म्हणालो, काय ?
..... अरे मला नीट ऐकू येत नाहीये,
जोरात पाऊस पडतोय नंतर फोन कर.
( आता टू टू आवाज येत होता )
मग मी पावसाकडे रागानी बघितले,
तो म्हणाला, चल तुझ्यासाठी मी आवरले.
मी विचारले, अरे असा जाऊ नको, पुन्हा कधी येशील.
तो म्हणाला, पुन्हा जेंव्हा तिला तुझी आठवण येईल.
सुहास.