शेवटी

म्रत्युला ती म्हणाली बाबा थोडं थांब,


मी जरा जावुन येते,


त्यांनी चष्मा दिला होता ठेवायला,


तेवढा जागेवर ठेवलाय का पाहुन येते.


 


 


लग्नातला कोट तुमचा,


आपला बाळ कधीकधी घालतो,


अन घातला कोट की,


तुमच्या सारखचं वेड लावणारं चालतो.


 


प्रेरणा :


 


म्रत्युला मी म्हणालो


तुला १०० वर्ष आयुष्य आहे


मरण चाटच पडलं म्हणालं


काय हा मनुष्य आहे.


                              चंद्रशेखर गोखले.