तिच्या पत्राचं एक वैशिष्ट्य म्हणजे
तिने बरिच वाक्य अर्धवट सोडली होती,
निरखुन पाहील्यावर कळालं तिने
एकच ओळ लिहुन प्रत्येक वेळ ती खोडली होती.
आपण प्रेमात लिहिलेल्या पत्रांची
मी आजही सांभाळुन ठेवलीयत लक्तरं,
खरं वाटतं नसेल तर पहा,
माझ्या कोटाला आजही त्याच लक्तरंची अस्तरं.