मन पाख़रु पाख़रु पावसात चिंब होई
फ़ुलापानात कळ्यात सुवासात दंग होई
मन भ्रमर भ्रमर मन मधाळ गोड्वा
त्याच गोड्व्यासाठी ते पाकळीत बंद होई
मन पाचोळा हिरवा मन चांद्ण्यांचा थवा
त्याच चांदण्यामागे ते भराभर धाव घेई
मन पागोळी पागोळी गर्द हिरवी रांगोळी
त्याच हिरव्या रंगात तेच हरवुन जाई
-केदार जोशी