शब्दांना नसते दुःख, शब्दांना सुखही नसते
ते वाहतात जे ओझे, ते तुमचे माझे असते
-सुधीर मोघे
काल (३ जुलै २००६) पुण्याच्या बालगंधर्व रंगमंदिरात कविवर्य सुधीर मोघे यांच्या 'कविता पानोपानी' या कार्यक्रमाच्या ध्वनिफीतींचा प्रकाशन सोहळा झाला. कवि सुधीर मोघे 'कविता पानोपानी' हा कार्यक्रम गेली वीस वर्षे करीत आहेत. हा एकपात्री आविष्कार स्वरूपाचा कार्यक्रम आहे. स्वतः सुधीर मोघे यांनी काही कवितांना चाली आणि संगीत दिले आहे. यात पूर्व-ध्वनिमुद्रित संगीताचा वापर केला आहे आणि त्यासोबत श्री मोघे कविता गातात. संपूर्ण कार्यक्रमात त्यांनी कधीही कागद वा कवितेच्या वहीचा आधार घेतलेला नाही. वीस वर्षे हा जवळजवळ दोन तासाचा हा कार्यक्रम ते असाचा सादर करीत आहेत.
आपल्यापैकी अनेकांनी त्यांची चित्रपटगीते ऐकली असतील. सुधीर फडके यांनी गायलेले 'सखी मंद झाल्या तारका' किंवा अगदी अलिकडील 'सांज ये गोकुळी' सारखी अप्रतिम गीते लिहिणारे सुधीर मोघे यांच्या कविता आपल्या संग्रही ठेवू इच्छिणाऱ्यांनी या (VCDs/DVDs) जरूर विकत घ्याव्यात. पुण्याच्या 'रसिक साहित्य' ने याची वितरण जबाबदारी घेतली आहे. एक महिन्यासाठी २५० च्या VCDs १५० रू. ला तर DVDs ३५० ऐवजी ३५० रू. ला देणार आहेत. कालचा प्रतिसाद पाहता पहिले वितरण फार लवकर संपेल असे वाटते. त्यामुळे लवकर विकत घ्याव्यात.
मी पुणेकर आहे. कुणास विकत घेण्यास मदत हवी असल्यास जरूर सांगणे.
ता.क. मी फक्त कविताप्रेमी आहे, रसिकचा वितरक नव्हे. हा लेख फ़क्त इतरांना महिती व्हावी म्हणून. ही जाहिरात नव्हे. नाहीतर प्रशासक आक्षेप घेतील. (ह. घ्या)