पाऊस आणि मी (२)

पाऊस आला                  


नद्या भरून वाहू लागल्या,


माझ्या मनात मात्र        


भावना अजून दाटलेल्या.


विजा चमकल्या              


एक क्षण लख्ख प्रकाश,


माझ्या डोळ्यांना            


अजुनही तुझीच आस.


गार वारा मला             


स्पर्श करून वाहू लागला,


तुझा हात माझ्या हातात


यायचा मात्र राहुन गेला.


शब्द नाहीत माझ्याकडे  


तुच काही बोल ना........


हा पावसाळा तुझ्यावाचून 


 कसा जगू सांग ना.


 


तुझाच,


सुहास.