निशःब्द

 


निशःब्द केलेस तु मला,


आता मी काय बोलणार तुला.


भेटलीस नाहीस तु मला जाताना,


तेंव्हाच कळाले देणार मला तु यातना.


जाताना जे काही माझे होते


ते सर्व तु घेऊन गेलीस.


न विसरता मात्र तु,


अश्रू डोळ्यांत सोडून गेलीस.


एक प्रश्न माझा मलाच


आता मी विचारत राहतो,


ती कोण आहे जिच्यासाठी,


कविता अजुनहि मी करत राहतो.


 


सुहास.