नभ बरसले असे
पाऊसही झाला चिंब
ओल्या आठवणींसवे
असे ओघळले थेंब
वाट पाहता पाहता
धुंद क्षण, धुंद मन
तुझ्या स्पर्शाने फुलावा
देह सारा कण.. कण..
तुझ्या श्वासाचेच आता
माझ्या ओठी दवबिंदू
मुक्या स्पर्शास आतूर
मन लागे करवंदू
भेट एकवार मला
तुझ्या कुशीत शिरू दे
वेड्या पावसाच्यापरि
तुझे प्रेमही झरू दे !
( 'बंद ओठ माझे' मधून )