पहाटवारा

दवबिंदूंनी भिजलेली पहाट...
अन हलकासा पहाटवारा
वाटतं... ओंजळीत गोळा करावा
अगदी साराच्या सारा !