पायवाट सोडुन चालल
की रस्ता चुकतो म्हणतात.....
पण प्रेमात पडणारे बहूतेक जण
योग्य रस्ता असूनही भरकटतात......
-=-=-=-=-=-=-=-=-=-=-=-=-=-=-=-=-=-=-=-=-=-=-=-
तू बघायाच टाळलस
की जणू ह्रदयाचा ठोकाच चुकतो.....
श्वास घेताना मी घेतो
पण सोडायचा तेवढा विसरतो......
-=-=-=-=-=-=-=-=-=-=-=-=-=-=-=-=-=-=-=-=-=-=-=-
प्रत्येक वेळेस मी हाक मारली
प्रत्येक वेळेस तू ओ दिलीस....
पण आता काय झाल ..
का , तू मला विसरून गेलीस?
-=-=-=-=-=-=-=-=-=-=-=-=-=-=-=-=-=-=-=-=-=-=-=-
तूझ्या जवळ सगळ असूदे
मला सांगण्यासारख ......
आणि माझ्याजवळ काही नसाव
तूझ्यापासून लपवण्यासारख.....
---दिलराज