शेवट
प्रत्येक कडव्याला शेवट असतो,
यमक असले तरी नसले तरी;
प्रत्येक कथानकाला शेवट असतो,
गमक असले तरी नसले तरी.
प्रत्येक गीताला शेवट असतो,
सूर जुळले तरी ढळले तरी;
प्रत्येक रस्त्याला शेवट असतो,
वळणावर वळले तरी थांबले तरी;
प्रत्येक नात्याला शेवट असतो,
धागा असला तरी तुटला तरी;
प्रत्येक मेघाला शेवट असतो,
बांध असला तरी सुटला तरी;
प्रत्येक गोष्टीला शेवट असतो,
सुरुवात असली तरी नसली तरी;
प्रत्येक कवितेलाही शेवट असतो,
अर्थ असला तरी नसला तरी......
--------स्वप्निल.